KMS OXIDE FORMULATION FERTILIZER
KMS खत हे बहुगुणी पोषणाचा परिपूर्ण स्रोत आहे, ज्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या महत्त्वाच्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. याचा वापर पिकांची गुणवत्ता, उत्पादनक्षमता, आणि पोषण सुधारण्यासाठी केला जातो.
KMS FERTILIZER ची प्रमुख फायदे:
KMS पिकांच्या पोषणासाठी उपयुक्त आहे, कारण त्यातील पोटॅशियम पिकांची वाढ आणि फळांच्या टिकवणक्षमतास चालना देते. मॅग्नेशियममुळे क्लोरोफिल तयार होऊन प्रकाशसंश्लेषण सुधारते, तर सल्फर पोषणद्रव्यांचे शोषण वाढवते. या तिन्ही पोषकतत्त्वांचा एकत्रित परिणाम पिकांना ताणतणाव, कीड आणि रोगांपासून संरक्षण देतो. क्लोराईडमुक्त असल्याने हे तंबाखू, द्राक्ष, बटाटे आणि सिटरससारख्या संवेदनशील पिकांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
हे कमी pH असलेल्या किंवा वाळूमिश्रित मातीसाठी उपयुक्त ठरते, कारण अशा मातींमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरची कमतरता असते. याशिवाय, हे खते नायट्रोजन आणि फॉस्फरस खतांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करते.
प्रयोगाची वेळ आणि पद्धत:
KMS FERTILIZER पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर म्हणजेच पोषण / फुगवण काळात करता येतो. योग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही सुधारते. कंदवर्गीय, फळझाडे, पालेभाज्या, डाळी आणि धान्ये यांसारख्या पिकांसाठी हे खत उत्तम आहे.
ड्रीपमधून एकरी 5 किलो व फवारणीतून 4 ग्राम प्रती लिटर पाण्यात घ्यावे
पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि उत्पादन टिकवण्यासाठी KMS खत निवडा.
Reviews
There are no reviews yet.